न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- संत निरंकारी मिशनच्या वतीने पर्यावरण दिवसानिमित्त आज सोमवारी लोणावळा-खंडाळा येथे स्वच्छता आणि वृक्षारोपण अभियान संपन्न झाले. या अभियानात सुमारे २००० हुन अधिक स्वयंसेवक उपस्थित होते.
लोणावळा-खंडाळा परिसरात सकाळी ७:३० ते १२:३० या वेळेत मुंबई-पुणे महामार्गाचे दोन्ही बाजूचे रस्ते,खंडाळा ते अमृतांजन पॉईंट, वलवन तळे, कावेरी फार्म, नागरगाव, लोहगड उद्यान, रायवूड ते लोणावळा डॅम गेट, आय.एन.एस. ते भुशी, तुंगार्ली चौक ते ग्रामीण पोलीस स्टेशन, नगरपरिषद कार्यालय, मावळा पुतळा येथे स्वछता अभियान संपन्न झाले.
रायहुड पार्क मध्ये १०० वृक्षांची लागवड देखील करण्यात आली. मिशनच्या युवा स्वयंसेवकांनी बीट प्लास्टिक पोल्युशन थीमवर लघु नाटिकांचे आयोजन करून लोकांना पर्यावरण संकटाविषयी जागृत होण्याची प्रेरणा दिली, अशी माहिती पुणे झोनचे प्रमुख ताराचंद करमचंदानी यांनी दिली.
या अभियानाला शरद कुलकर्णी (उप-मुख्यधिकारी, लोणावळा नगरपरिषद), दत्तात्रय सुतार (आरोग्य अधिकारी), तसेच नगरपरिषदेचे आणि संत निरंकारी मंडळाचे इतर पदाधिकारी देखील उपस्थित होते. लोणावळा शाखेचे महादेव सुतार यांनी आभार व्यक्त केले.















