न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०५ जून २०२३) :- गणपती मंदिरामधील स्टेनलेस स्टील दानपेटीचे कुलुप कशाच्या तरी सहाय्याने तोडले. त्यातील अंदाजे रोख रक्कम १५,००० रुपये कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेली आहे.
हा प्रकार (दि. ४) रोजी रात्री २.०० ते (दि. ४) रोजी सकाळी ०८.३० च्या दरम्यान गणेश नगर, पिंपळे निलख बसस्टॉप जवळील गणपती मंदिरात घडली.
फिर्यादी सागर मनोहर साठे यांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी २६२/२०२३ भादवी कलम ३७९ नुसार आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.












