न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २४ मार्च) :- जैन समाजातील विविध घटकांसाठी शैक्षणिक तसेच सामाजिक उन्नतीसाठी विधायक कार्यात अमुल्य योगदान असणारे प्रा. अशोककुमार पगारिया यांचे कार्य कौतुकास्पद आहे. या क्षेत्रातील त्यांचे कार्य युवकांना प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे, असे प्रतिपादन श्री जैन सेवा संघाचे चेअरमन शांतीलालजी कवाड यांनी व्यक्त केले.
श्री जैन सेवा संघाच्या वतीने ‘जैन सेवा’ पुरस्कारांच्या ११ व्या सन्मान सोहळयाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी जैन समाजातील विविध क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. त्यामध्ये भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन डॉ. अशोककुमार पगारिया, जैन ज्योती पत्रिकाचे संपादक सुमतीकुमार जैन, इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातील प्रा. मंगलचंदजी टाटीया, ज्येष्ठ समाजसेविका मंजू मंगलप्रभात लोढा यांचा ‘जैन सेवा रत्न’ पुरस्कार देउन गौरव करण्यात आला.
यावेळी गुजरात उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश एस. जी. शहा, जैन कॉन्फरन्सचे माजी अध्यक्ष मोहनलाल चोपडा, महिला अध्यक्षा रूचिरा सुराणा, जैन इनिंग फाउंडेशनचे जे. बी. जैन, ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. सुषमा शिंगवी, जैन सेवा संघाचे अध्यक्ष पारसजी गोलेचा, उपाध्यक्ष मांगीलालजी जैन, यु. एम. लुनावत, अशोकजी हुंडिया, निहालचंद मुनोत, बसंत जैन, प्रणित जैन आदी उपस्थित होते.
डॉ.पगारिया यांनी मागील ३० वर्षात सामाजिक, धार्मिक, बँकिंग, रक्तदान, शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केली आहे. त्यांचा पिंपरी चिंचवड जैन महासंघाच्या स्थापनेमध्ये सिंहाचा वाटा आहे. त्यांनी श्री ऑल इंडिया श्वे. स्था. जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, भगवान महावीर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असे काम केले आहे. २१ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष म्हणूनही डॉ. पगारिया यांची निवड झाली आहे.
कार्यक्रमास ज्येष्ठ उद्योजक भवरलाल बोहरा, रिखब सांकला, विजय डागा, मोहन लोढा, सुरेश शिंगी, विजय कोठारी, विलास पगारिया, वसंत बोरा, रमनलाल कर्नावट, संदीप फुलपगर, सुनंदा भन्साली, कविता शेठीया, लता पगारिया व संपूर्ण भारतातून आलेले जैन बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.
















