न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २४ मार्च) :- मावळ लोकसभा मतदार संघांचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांनी निगडी येथे शनिवार (दि. २३) रोजी पक्षाच्या पदाधिका-यांची भेट घेतली.
कार्यकर्त्यांशी संवाद साधताना पार्थ पवार म्हणाले की, गुजरातमध्ये किती विकास झाला, किती नाही, हे आपल्या सर्वांना माहीत आहे, असे असताना गुजरातचे मॉडेल देशभरात गाजू शकते. तर, राष्ट्रवादीच्या माध्यमातून माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेले पिंपरी-चिंचवडच्या विकासाचे मॉडेल राज्यभर का गाजू शकत नाही?
कार्यकर्त्यांनी जर ठरवलं तर ते सहज शक्य आहे. आपल्याला पिंपरी-चिंचवड आणि बारामती सारखा विकास भविष्यात मावळमध्ये करायचा आहे. तर, त्यासाठी सर्वांनी कामाला लागले पाहिजे, अशी सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना यावेळी केली.















