न्यूज पीसीएमसी नेटवर्क
निगडी (दि. २५ मार्च) :- निगडीतील प्रभाग क्रमांक १३ यमुनानगर परिसरातील धर्मविर संभाजी महाराज क्रिंडागणाच्या आवारात सोमवार (दि. २५) रोजी जेष्ठ नागरीक संघाच्या नामफलकाचे मनसे गटनेता सचिन चिखले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी परीसरातील जेष्ठ नागरिक आजी-आजोबा व ज्यांच्या लग्नाला ५० वर्ष पुर्ण झाले आहेत, त्यांचा सत्कार संभारभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी प्रभागातील माजी नगरसेविका सुलभा उबाळे व जेष्ठ नागरीक आदी उपस्थित होते.
















