न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्यभिषेक सोहळा दिनाचे औचित्य साधून शिवसेना, रहाटणी काळेवाडी विभाग व पवना हेल्थ क्लबच्या वतीने मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.
पुतळा आणि परिसर स्वच्छ करण्यात आला. सामुहिकरित्या महाराजांच्या पुतळ्याला दुग्धस्नान व पुष्पहार अर्पण करण्यात आले. शिव वंदना त्यांनतर क्लबचे सभासद सुनिल विटकर यांनी शिवललकारी देवून उपस्थित शिवप्रेमींच्या अंगाअंगात उत्साह निर्माण केला. शेवटी महाराजांना त्रिवार अभिवादन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख हरेश नखाते, गोरख तात्या कोकणे, प्रहारचे संजय गायके, संजय पगारे, एकनाथ मंजाळ, गोरख पाटील, शंकर जाधव, अंकुश कोळेकर, राजेंद्र भरणे, कालिदास मोरे, शंकर नाटेकर, नरसिंग माने, सावताराम महापुरे, संजय मोरे, विजय पवार, रवींद्र घडशी, प्रकाश मुरकुटे, सतीश काटे, मारुती ठाकर, हनुमान पिसाळ, नरेंद्र हेडाऊ, सुनील झांजुरणे, शिवस्मारक समितीचे सुरेंद्र पासलकर, मारुती लोखंडे, तात्या माने, संजय खेंगरे, सुनील थोरात, सर्जेराव जुनवणे, शिवसेना व पवना हेल्थ क्लबचे बहुसंख्य सभासद आणि एच ए तील पुतळा समिती सदस्य उपस्थित होते.












