न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- कर्जाचा हप्ता भरला नाही म्हणुन फायनान्स कंपनीचे लोकं फिर्यादीच्या घरी आले. कंपनीवरील पत्त्यावर न जाता सह आरोपीने आरोपीच्या सांगण्यावरुन जबरदस्तीने घराचा दरवाजा ढकलला. फिर्यादी महिलेने त्याला विरोध केला.
आरोपीने महिला फिर्यादीला जोरात ढकलुन दिले. तसेच त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न करीत फिर्यादीच्या पतीची पाहणी करुन पती मिळुन न आल्याने फिर्यादीला शिवीगाळ केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ११/०५/२०२३) रोजी सांयकाळी ५,३० वाजता मोशी प्राधिकरण येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी अमोल बापु ठोबरे, मॅनेजर आकाश कदम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४२/२०२३ भादंवि कलम ४५२,३५४, ५०४,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.












