न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे सभासद ॲडव्होकेट बबनराव बवले यांचे पुत्र ॲडव्होकेट अजिंक्य बवले यांची महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेमध्ये राजपत्रित अधिकारी म्हणून निवड झालेली आहे.
तसेच ॲडव्होकेट बारचे जेष्ठ सदस्य ॲडव्होकेट पांडुरंग नांगरे यांची पुणे जिल्हा नोटरी असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. याबाबत पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या वतीने पिंपरी न्यायालयात वकिलांच्या बार रूममध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट नारायण जगन्नाथ रसाळ हे होते. तसेच या कार्यक्रमास उपाध्यक्ष ॲडव्होकेट जयश्री कुटे, सचिव ॲडव्होकेट गणेश शिंदे तसेच महिला सचिव ॲडव्होकेट प्रमिला गाडे, सदस्य ॲडव्होकेट प्रशांत बचुटे, ॲडव्होकेट पवन गायकवाड, ॲडव्होकेट राजेश रणपिसे, ॲडव्होकेट अरुण खरात व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष जेष्ठ वकील व वकील बंधू भगिनी हजर होते.












