न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी संगीत अकादमीच्या वर्धापन दिनानिमित्त भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२३ चे आयोजन (दि ८ ते ९) प्राधिकरणातील ग. दि. माडगुळकर नाटयगृहात करण्यात आले आहे.
संगीत अकादमीमध्ये शास्त्रीय गायन, हार्मोनियम वादन, तबला वादन, सुगम संगीत यांचे प्रशिक्षण दिले जाते. संगीत अकादमीमधुन अनेक उदयोन्मुख कलाकार नावारुपास आले. संगीत शिक्षणा बरोबरच विविध शैक्षणिक आणि सांगितिक उपक्रमाचे आयोजन महानगरपालिकेचे वतीने केले जाते. त्यास अनुसरून यावर्षी “भारतरत्न पंडित भीमसेन जोशी संगीत अकादमी महोत्सव २०२३” चे आयोजन केलेले आहे.
त्यानिमित्ताने नामवंत कलाकरांचे कला सादरीकरण या महोत्सवात होणार आहे. हा कार्यक्रम पि.चिं. शहरवासीयांसाठी विनामुल्य ठेवण्यात आलेला आहे. जास्तीत जास्त रसिक प्रेक्षकांनी याचा लाभ घ्यावा, असे महानगरपालिकेच्या वतीने सुचविण्यात आलेले आहे.












