न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागातील सहाय्यक उद्यान निरीक्षकला साडेसतरा हजारांची लाच स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने आज बुधवारी रंगेहाथ पकडले आहे.
नेहरूनगर येथील महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण पुष्प उद्यान विभागाचे सहाय्यक निरीक्षक किरण मांजरे यांनी एका ठेकेदाराला लाच मागितली होती. त्याची तक्रार लाचलुचपत विभागाकडे तक्रारदाराने केली होती. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली.












