न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी ( दि. ०७ जून २०२३) :- आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये अवैध शस्त्रे बाळगणारे किंवा कोणत्याही प्रकारचे शस्त्र बाळगुन गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांविरुध्द विशेष मोहिम राबवुन कारवाई करण्यात यावी, असा आदेश पोलीस आयुक्तांनी पोलिसांना दिला होता. खंडणी विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार हे अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढत असताना रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती मिळाली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. रोहीत संतोष जाधव, आदित्य बापू शिंदे यांना पिंपळे निलख येथुन ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातुन ८२.९०० किंमतचे २ देशी बनावटीचे पिस्टल, १ छऱ्याची गन व २ जिवंत काडतुसे (राऊंड) जप्त करण्यात आलं आहे. त्यांच्याविरुध्द सांगवी पोलीस ठाण्यात २६८ / २०२३ आर्म अॅक्ट कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (३) सह १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन या गुन्हयाचा पुढील तपास खंडणी विरोधी पथकाचे पोहवा ७०५ निशांत काळे हे करीत आहेत. अटक आरोपी रोहीत संतोष जाधव हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन, त्याच्या विरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्नचा गुन्हा दाखल आहे.
ही कारवाई विनय कुमार चौबे, डॉ. संजय शिंदे पोलीस सहआयुक्त, वसंत परदेशी अपर पोलीस आयुक्त, स्वप्ना गोरे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे, सतिश माने, सहा. पोलीस आयुक्त, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंद पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, खंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधीखंडणी विरोधी पथक, तसेच खंडणी विरोधी पथकाचे सहा. पोलीस उप-निरीक्षक अशोक दुधवणे, पोलीस अंमलदार गणेश गिरीगोसावी, विजय नलगे, रमेश गायकवाड, निशांत काळे, प्रदीप गोडांबे, किरण काटकर, आशिष बोटके व सुधीर डोळस यांच्या पथकाने केली आहे.