न्यूज पीसीएमसी नेटवर्क
चिखली (दि. २५ मार्च) :- चिखलीतील हनुमाननगर ताम्हाणेवस्ती येथे शिवस्वराज्य प्रतिष्टानच्या वतीने शनिवार (दि. २३) रोजी सार्वजनिक शिवजयंती महोत्सोवाचे आयोजन करण्यात आले होते.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या शुभ हस्ते शिवरायांच्या प्रतीमेचे पुजन करण्यात आले. यावेळी माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते दत्ता साने, नगरसेविका संगीता ताम्हाणे, नगरसेवक पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, सुर्यकांत भसे, दत्ता पवळे, काशिनाथ जगताप, आशा भालेकर, धनंजय वर्णेकर, ज्योती गोफने, पांडुरंग भालेकर आदी उपस्थित होते.
शिवजयंती निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परीसरातील बालगोपाळांनी पोवाडे आणी देशभक्तीपर गीते सादर केले. शिवशाहीर सुरेशजी सुर्यवंशी यांच्या पोवाड्याचा कार्यक्रम यावेळी संपन्न झाला. साने चौकी पोलिस दलाच्या वतीनेही यात हिरारीने सहभाग घेतला, असे महोत्सोवाचे आयोजक रावसाहेब थोरात यांनी सांगितले.
















