न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- डोक्यावरुन मिक्सर गाडीचे चाक गेले. फिर्यादीच्या भावाला गंभीर दुखापती झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. आरोपी हा त्यांच्या मरणास कारणीभुत झाला आहे. अंगद अरुण तिवारी असे मयताचे नाव आहे. मयत फिर्यादीचा भाऊ गाडीत झोपला होता. आरोपी चालकाने मिक्सर गाडी अविचाराने व हयगयीने रस्त्याच्या परिस्थीतीकडे दुर्लक्ष करुन चालवुन अपघात केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. ६) रोजी रात्री १०.३० च्या सुमारास मुंगी कंपनीच्या बाजुला लेबर कॉलनी वराळे ता. खेड जिल्हा पुणे येथे घडली. फिर्यादी मुकेश अरुण तिवारी यांनी आरोपी शेषराव साहेबराव आघाव याच्या विरोधात फिर्गुयाद दिली आहे.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी ३१२/२०२३ भा.द.वि कलम ३०४ (अ), ३३७, ३३८,२७९ मो.वा. कायदा कलम १८४ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले आहे.