न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०८ जून २०२३) :- मोशी येथील बो-हाडेवाडीमधील सोसायटीच्या लिफ्टमधुन फिर्यादीची मुलगी वर येत होती. त्यावेळी आरोपीने फिर्यादीच्या मुलीच्या अवघड जागेस तसेच शरीरास इतर ठिकाणी हात लावुन ‘तु मला आवडतेस’ असे म्हणुन तीच्या मनास लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले.
ही घटना (दि. ४) रोजी पाच वाजता घडली. फिर्यादी संजय उगाडे यांनी आरोपी मनोज मुरलीधर पवार याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २४३/२०२३ भा.दं.वि कलम ३५४, ३५४ (अ) बालकांचे लैंगिक अपराधा पासुन संरक्षण कायदा २०१२ चे कलम ८,१२ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.