- शिबिरासाठी चाकण MIDC उद्योजक संघटनेचा पुढाकार…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- ” रिश्तों मे नई रोशनी ” या फॅमिली शिबिराचे चाकण MIDC उद्योजक संघटनेच्या वतीने निगडी येथे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. तेज ग्यान फाउंडेशन ‘सरश्री‘ यांच्या शिकवणीवर आधारित या शिबिरास उद्योजकांसह त्यांच्या कुटुंबीयांचा उस्देफुर्खीत सहभाग लाभला.
कोणत्याही कुटुंबामध्ये सुसंवाद नसल्यामुळेच सर्व अडचणी तयार होत असतात. हा सुसंवाद नेमका कसा करायचा?, घरी सर्वांनी मिळून कोणकोणत्या कार्यपद्धती अवलंबल्या पाहिजेत, याचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण या शिबिरात देण्यात आले. शिबिरातून बाहेर पडताना सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाचे तेज होते.
या फॅमिली शिबिराचे आयोजन चाकण MIDC उद्योजक संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे, संचालक प्रवीण शिंदे यांनी केले होते. संघटनेचे सचिव निवास माने, खजिनदार किसन गायकवाड, संचालक दत्तात्रय दगडे व लक्ष्मण काळे, श्रीराम हंडीबाग, नंदकुमार सावंत आदी उद्योजकांनी मोलाची साथ दिली.
तेज ग्यान फाउंडेशनकडून सत्यचार्य स्नेहाली मंदार वायकर, नेमीचंद सखाराम तांबे, महेश जाधव आणि आदी तेजसेवक यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
संघटनेचे अध्यक्ष जयदेव अक्कलकोटे यांनी आभार मानले.












