न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- मोशी-प्राधिकरण येथील मोकळ्या मैदानात अज्ञाताने (वय अंदाजे ४० ते ४५ वर्षे) अनोळखी व्यक्तीचा अज्ञात कारणावरुन खून केला. मृताच्या चेह-यावर सिमेंटच्या पेव्हींग ब्लॉकने व ओबड धोबड दगडाने मारल्याच्या खुणा आहेत.
हा प्रकार (दि. १२) रोजी १ वाजेच्या सुमारास मातेरे हाऊस, समोर सेक्टर नं. ११, मोशी प्राधिकरणाच्या मोकळ्या मैदानात उघडकीस आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात २५१/२०२३ भा.दं.वि. कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.