न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १३ जून २०२३) :- पोहता येत नसल्याचे माहित असतानासुध्दा आरोपीने स्वतःच्या ११ वर्षीय मुलाला इंद्रायणी नदीतील खोल पाण्यात नेले. स्वतःच्या मुलाला तीथे सोडुन आरोपी इंद्रायणीच्या दुस-या काठावर निघुन गेला. त्यामुळे फिर्यादीच्या मुलाचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ८) रोजी दुपारी १२:४५ च्या सुमारास माऊली मंदीर, इंद्रायणीघाट नदीमध्ये आळंदी येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी विनायक धोंडीराम इप्पर याच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
आळंदी पोलिसांनी १४७/२०२३ भा.दं.वि कलम ३०४, ५०६ (२) नुसार गुन्हा दाखल करीत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.