न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १४ जून २०२३) :- राज्य शासनाच्या उपजिल्हाधिकारी संवर्गातील पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रति नियुक्तीने आलेले उपायुक्त सचिन ढोले यांची सातारा जिल्ह्यातील फलटण येथे उप विभागीय अधिकारी या पदावर बदली झाली आहे. याबाबतचा स्वतंत्र आदेश महसूल व वन विभागाच्या वतीने १२ जून रोजी जारी केला आहे.
उपायुक्त ढोले यांनी महापालिकेत आकाश चिन्ह व परवाना विभाग, पशू वैद्यकीय विभाग, भूमी आणि जिंदगी विभागाचे कामकाज पाहिले. तसेच मार्चमध्ये झालेल्या चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणूनही ढोले यांनी कामकाज पाहिले होते.
राज्यातील सर्वात मोठा मतदार संघ असलेल्या चिंचवडची पोटनिवडणूक अतिशय नियोजनपूर्वक आणि शांततेत पार पडली. नागरिकांसोबतचा त्यांचा संपर्क देखील चांगला होता.












