- भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचं काटेकोर नियोजन…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी चिंचवड (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- भाजपच्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात उत्साह निर्माण करणारा चंद्रकांतदादा पाटील यांचा दौरा पार पडला. शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या नियोजनानुसार विधानसभा क्षेत्रांचा दौरा पूर्ण झाला.
उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री असलेल्या चंद्रकांतदादा पाटील यांनी शहरातील विविध भागांना भेट देत नागरिकांशी संवाद साधला. पाणीपुरवठा, रस्त्यांची अवस्था, वाहतूक कोंडी, अतिक्रमण आणि आरोग्यविषयक समस्यांवर अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा झाली.
दादांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश दिले की पिंपरी चिंचवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या औद्योगिक शहरात मूलभूत सुविधांबाबत ठोस, वेळबद्ध आणि कार्यक्षम पावले उचलावीत. शहरातील प्रलंबित प्रश्नांकडे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, अमित गोरखे आणि उमाताई खापरे यांनी लक्ष वेधले. या समस्यांबाबत नाराजी व्यक्त करत दादांनी लवकरात लवकर मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या कॅबिनेट मंत्र्यांनी झोपडपट्टीतील कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्याच्याशी आणि त्याच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. सामान्य नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेण्याच्या या शैलीने कार्यकर्त्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि प्रेरणा निर्माण केली.
बैठकीत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी स्वच्छता, वाहतूक, रस्ते आणि पाणीपुरवठ्यावरील अनियमितता मांडत प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली.
दौऱ्यात नागरिकांशी थेट संवादातून दादांनी संयमी नेतृत्व दाखवले. त्यांच्या संवादातून सकारात्मकता, आत्मीयता आणि विश्वासाचे वातावरण शहरात निर्माण झाले.
दौऱ्यास जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे, आमदार महेश लांडगे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, आमदार उमाताई खापरे, खासदार अमर साबळे, माजी आमदार अश्विनी जगताप, सदाशिव खाडे, मोरेश्वर शेडगे, मधुकर बच्चे, संजीवनी पांडे, वैशाली खाडे, राजू दुर्गे, तुषार हिंगे, केशव घोळवे, शैलेश मोरे, योगिता नागरगोजे, कुणाल लांडगे, कैलास कुटे, मंगेश धाडगे, धरम वाघमारे, जयदीप खापरे, अनिता वाळुंजकर, गणेश लंगोटे, सुनील कदम, महेंद्र बाविस्कर आणि विविध विभाग प्रमुख, पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.












