न्यूज पीसीएमसी नेटवर्क
काळेवाडी (दि. १० नोव्हेंबर २०२५) :- रहाटणी फाटा परिसरात अतिक्रमण कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाला विरोध करून सरकारी कामात अडथळा आणणाऱ्या आठ जणांविरोधात काळेवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
घटना ८ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता घडली. पथक अतिक्रमण हटवण्याचे शासकीय काम करत असताना आरोपींनी एकत्रित जमून कारवाईमध्ये अडथळा निर्माण केल्याचे तक्रारीत नमूद आहे.
फिर्यादी मनिष जगताप (५७) हे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे मुख्य लिपीक आणि अतिक्रमण निरीक्षक असून त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली.
आरोपींमध्ये पाच महिला (वय ३५-४०), तसेच सागर बागवान (२७), मारुती निंबाळकर (७१) आणि धनाजी येळकर पाटील हे समाविष्ट आहेत.
काळेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागनाथ सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.












