न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. १५ जून २०२३) :- केंद्रातील मोदी सरकारला यशस्वी नऊ वर्षे पूर्ण झाल्या निमित्त आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ‘मोदी @ ९’ विशेष कार्यक्रमा अंतर्गत ‘लाभार्थी संवाद’ या कार्यक्रमाचे आयोजन कुदळवाडी याठिकाणी करण्यात आले होते.
या कार्यक्रमाला भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राहुल लोणीकर व भाजयुमो राष्ट्रीय सचिव तथा महाराष्ट्र प्रभारी गौरव गौतम, सुदर्शन पाटसकर, गणेश वर्पे, अजित कुलथे, संकेत चोंधे, शिवराज लांडगे, रवी जांभुळकर उदय गायकवाड, संतोष मोरे, सचिन जयभाय हे पदाधिकारी उपस्थित होते
माजी स्वी सदस्य दिनेश लालचंद यादव यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अनेक लाभार्थी या ठिकाणी उपस्थित होते. सर्व लाभार्थी यांनी कोणत्या योजनेचा लाभ घेतला याची सविस्तर माहिती यावेळी दिली. सर्व समाजातील नागरिकांना सोबत घेऊन भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य माणसाला विकासाचा केंद्रबिंदू मानून काम करत आहेत. समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत योजना पोचविण्यासाठी सर्व भारतीय जनता पार्टी चे कार्यकर्ते काम करत आहेत, असे यादव यावेळी म्हणाले. सुत्रसंचालन नितीन साळी यांनी केले.











