न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- वडिलांना ओढत नेऊन त्यांचा खून केला, असे फिर्यादीला त्यांचा मृतदेह पहिल्यानंतर समजले. तसेच मयत वडिलांच्या शर्टाचे बटन तुटलेले, छातीवर झटापट झाल्यासारखे व ओरखडे दिसत होते, तसेच डाव्या पायाला जखम दिसत होती व उजवा हात फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीच्या निदर्शनास आले. दोघांनी अज्ञान कारणाने कशाच्यातरी सहाय्याने त्यांना मारहान करुन त्यांचा खुन केला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १९) रोजी रात्री अंदाजे १०.३० ते ११.०० च्या दरम्यान नुतन भोसरी हॉस्पीटलच्या बाजुला बैलगाडा शर्यत घाटाजवळ, भोसरी येथे घडला.
फिर्यादीचा मुलगा आशिष भास्कर साळवे याने आरोपी अज्ञात दोन इसम यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. भोसरी पोलिसांनी ५१९ / २०२३ भा.दं.वि कलम ३०२,३२३,३४ नुसार गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक केली आहे.