न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- ‘पत्नीला घटस्पोट दे’ म्हणत फिर्यादीच्या मुलाला आरोपींनी धमकावले. त्याला शिवीगाळ करुन त्याचा मानसिक छळ केला. तसेच सह आरोपीने महिला आरोपीला त्रास देतो काय म्हणुन शिवीगाळ करुन मारहाण करुन शारीरीक त्रास दिला. त्यांच्या शारीरीक व मानसिक त्रासाला कंटाळुन फिर्यादीच्या मुलाने गळफास घेवुन आत्महत्या केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.३१/१२/२०२२ पासुन ते दि. १४/०६/ २०२३ पर्यंत) अंबरवाडी, ता जिंतुर जि. परभणी तसेच विद्यानगर, चिंचवड येथे (दि.२०/०६/२०२३) रोजी रात्री ९.२१ वाजता घडली.
फिर्यादी लक्ष्मण संभाजी पात्रे यांनी महिला आरोपी, रमेश महादु धुमाळ, सत्यभामा रमेश धुमाळ, गणेश रमेश धुमाळ, विशाल रमेश धुमाळ, महिला आरोपी, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी आरोपींच्या विरोधात ६५४ / २०२३ भा.दं.वि. कलम ३०६, ३२३, ५०४, ५०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.