न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- आपसात संगणमत करून व्हॉट्सअॅप व टेलिग्राम आयडीवरुन फिर्यादीशी ओळख केली. त्यांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याकडुन वेळोवेळी आरोपींनी ऑनलाईन पैसे घेतले. फिर्यादी यांची १,७३,००० रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार (दि. १४/०४/२०२३) रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ४.०० वाजता सूर्योदय काळभोरनगर येथे घडला. महिला फिर्यादीने व्हाटसअप मो.नं. ९७१३२८४०३४ मोबाईल धारक अनोळखी व्यक्ती, महिला आरोपी, महिला आरोपी यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६५७ / २०२३ भा.द.वि.कलम ४२०, ४०६,३४, माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.