न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- शाडोफॅक्स टेक्नॉलॉजीस्ट प्रा. लि. कंपनीत कार्यरत असताना आरोपीने कंपनीत एकूण १०,०६,७९६ रूपयांचा गैरव्यवहार केला. कंपनीचा विश्वासघात करून आर्थिक फसवणुक केली. ही रक्कम त्याने त्याच्या आर्थिक फायदयाकरीता वापरलेली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०१/०४/२०२२ पासून १९/१०/२०२२ पर्यंत) वाघेवस्ती, चाकण येथील शाखेत घडली.
फिर्यादी विवेक अनिल गोरटमारे यांनी आरोपी सागर लहु ढेरे याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. चाकण पोलिसांनी ५५३/२०२३ भादवि कलम ४२०, ४०८ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.