न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- परदेशात विविध वस्तु आयात निर्यात करण्याचा व्यवसाय असल्याचे आरोपीने फिर्यादीचे पती आणि दीर यांना सांगितले. त्यावर विश्वास ठेऊन फिर्यादी महिलेने आरोपीला त्यांचा आयात निर्यातीच्या व्यवसायाची कंपनी असून त्यांच्या कंपनीकरिता साखर अपुरी पडत असल्याचे सांगितले. त्यावेळी आरोपीने त्यांचा मित्र सह आरोपी हा माझा मित्र असुन पंजाबमधुन विविध देशांमध्ये साखर निर्यात करीत असुन त्याची पासकॉन अॅग्रो नावाची कंपनी असुन तो त्या मार्फत परदेशात साखर निर्यात करत असतो. तुम्ही त्याच्याकडुन साखर मागवु शकता, असे सांगितले.
फिर्यादी यांनी आरोपीकडुन २६०० टन साखरेचे कोटेशन मागितले. त्याने २६०० टन साखरेची किंमत ११ लाख ९६ हजार अमेरीकन डॉलर म्हणजेज भारतीय कीमत ८ कोटी ९९ लाख ९९ हजार रुपये इतकी होत असल्याचे कोटेशन दिले. या रकमेच्या २० टक्के रक्कम म्हणजे १ कोटी ७९ लाख ९९ हजार ८०० हे आमच्या कंपनीला द्यावे लागतील, असे सांगितले. फिर्यादी यांनी त्यांच्या कंपनीच्या अकाऊंटमधुन सह आरोपीच्या पॉस्कॉन अॅग्रो कंपनीच्या अकाऊंटला १ कोटी ७९ लाख ९९ हजार ८०० इतकी रक्कम पाठवली. त्यानंतर आरोपी व सह आरोपी यांनी फिर्यादीला मुदतीत साखर न पाठविल्याने फिर्यादी यांनी दिलेली रक्कम अथवा साखर पाठवण्यास सांगितले. तेव्हा सह आरोपीने फिर्यादी यांनी पाठवलेल्या रकमेपैकी ५० लाख रुपये फिर्यादीच्या अकाऊंटला माघारी पाठवले. त्यानंतर फिर्यादी यांनी आरोपींना वेळोवेळी संपर्क साधुन शिल्लक रकमेविषयी विचारणा केली. मात्र फिर्यादीने दिलेल्या १ कोटी २९ लाख ९९ हजार ८०० रुपये रक्कमेचा आरोपींनी अपहार करुन फिर्यादी यांची आर्थिक फसवणुक केली आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
हा प्रकार मे २०२१ ते फेब्रुवारी २०२३ दरम्यान प्राधिकरण, निगडी येथे घडला. महिला फिर्यादीने आरोपी जेकब जॉर्ज, सतनाम सिंग यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी दोघांच्या विरोधात ३६७ / २०२३ भा.दं.वि. कलम ४२०, ४०९, ४६७,३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.