न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- मे. रेहान एंटरप्रायजेस कंपनीच्या संस्थापकांनी फिर्यादीची पत्नी, मुलाची तसेच ब-याच मध्यमवर्गीय, गरीब तसेच जेष्ठ नागरीकांना जास्त व्याज देण्याच्या आमिषाने पैसे गुंतवणुक करण्यास भाग पाडले. फिर्यादीच्या पत्नीची मुलाची तसेच इतर गुंतवणुकदारांची रक्कम रुपये ७,५६,००० रुपयांची फसवणुक केली आहे.
त्याचप्रमाणे आणखी इतर गुंतवणुकदारांची देखील अशाच प्रकारे फसवणुक झाल्याबाबत फिर्यादीला इतर गुंतवणुकदाराकडुन समजले आहे. आरोपीचा कोणत्याही गुंतवणुकदाराचे पैसे परत करण्याचा मानस दिसुन येत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि.०५/०६/२०२३ ते आज पावेतो), बाणेर, पुणे येथे घडली. फिर्यादी राजेंद्र केशव आळेकर यांनी आरोपी मे रेहान एंटरप्रायजेस कंपनीचे संस्थापक महादेव जाधव व इतर संचालक यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
हिंजवडी पोलिसांनी ७३४/२०२३ भा.द.वि कलम ४२०, ५०६, ३४ सह एमपीआडी कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.