न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- संत निरंकारी मिशनच्या वतीने ‘आंतरराष्ट्रीय योग दिनी’ मिशनच्या विविध शाखांमध्ये वसुधैव कुटुम्बकम चा सिद्धांत समोर ठेवत ‘वन वर्ल्ड, वन हेल्थ’ या विषयानुसार सकाळी ६:०० वाजल्यापासून स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या जागांमध्ये तसेच उद्यानांमध्ये योग दिन साजरा करण्यात आला.
पुणे जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या संत निरंकारी सत्संग भवन ,गंगाधाम आणि भोसरी सहित पुण्यातील मिशनच्या विविध सत्संग भवनांमध्ये ३१ ठिकाणी योग दिवसाचे आयोजन करण्यात आले होते. मिशनच्या भोसरी येथील सत्संग भवनमध्ये ४०० हुन अधिक साधकांनी या शिबिराचा लाभ घेतला. पतंजली योगपीठाचे ढवलेश्वर, सुरेश साळुंखे आणि अनंत सकपाळ यांनी योगाची प्रात्यक्षिके करून घेतली.














