न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- पिंपरी-चिंचवडसह चाकण, तळेगाव दाभाडे एमआयडीसीतील रसायनमिश्रित पाणी प्रक्रिया करुनच सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येत आहे.
त्यासाठी एमआयडीसीमार्फत सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प (एसटीपी) उभारणार येणार आहे. याबाबत उद्योगमंत्री उदय सामंत हे उद्या गुरुवारी (दि. २२) पिंपरी-चिंचवड महापालिकेत संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत.
पवना, इंद्रायणी व मुळा स्वच्छतेबाबत उद्योगमंत्री सामंत यांच्यासोबत खा. बारणे यांची मंगळवारी (दि. २०) मुंबईत बैठक झाली. एमआयडीसीतील कंपन्या, लघुउद्योग व वर्कशॉपचे रसायनमिश्रित पाणी थेट नदीपात्रात जाऊ नये. यासाठी गुरुवारी उद्योगमंत्री सामंत हे पालिकेत बैठक घेणार आहेत. आयुक्त, जिल्हाधिकारी, पीएमआरडीए आयुक्त, एमआयडीसीचे अधिकारी या वेळी उपस्थित राहणार आहेत.














