न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- महापालिकेच्या वतीने शुक्रवारी (दि. २३) सकाळी अकरा वाजता फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून ‘संवाद आयुक्तांशी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये आयुक्त शेखर सिंह थेट नागरिकांशी संवाद साधणार आहेत.
महापालिकेचे कामकाज अधिक लोकाभिमुख व्हावे यासाठी वेळोवेळी शहरातील विविध समाजघटकांशी संवाद साधला जातो. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त सिंह यांनी हा कार्यक्रम सुरू केला आहे. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता या कार्यक्रमांतर्गत ‘कौशल्य विकास आणि शिक्षण’ या विषयावर चर्चा करण्यात येणार आहे.
नवीन शैक्षणिक वर्षाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, पालक आणि इतर सर्व नागरिकांसाठी हा विषय महत्त्वाचा आहे. पालिकेच्या फेसबुक पेजवरून किंवा पीसीएमसी स्मार्ट सारथीच्या सोशल मीडिया चॅनल्सवरून नागरिकांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. महापालिकेचे कामकाज लोकाभिमुख होण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

















