न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २१ जून २०२३) :- चाकण (खराबवाडी) यू टर्न इंडस्ट्रिअल इस्टेट, एमआईडीसी येथिल ऑटर कंट्रोल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये प्रतिवर्षी योगदिवस साजरा करण्यात येतो. तसेच यावर्षीही मोठ्या जल्लोषात योगदिवस साजरा करण्यात आला. योगदिनी प्रमुख पाहुणे कलाकार राहुल जोशी हे होते.
कंपनीचे संचालक उल्हास जोशी आणि त्यांच्या पत्नी गायत्री जोशी हे दोघेही खुप आत्मीयतेने सर्व कर्मचाऱ्यांना योगाचे फायदे समजावून त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्याकडून योग्यरित्या योग करवून घेतात. तसेच ऑटर कंपनीमध्ये “दिवसाची सुरुवात योगाने” या संकल्पनेतून मागिल वर्षाच्या योग दिनापासून कंपनीमध्ये नियमित योग उपासना केली जाते.
ऑटर कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांनी एप्रिल 2022 ते जून 2022 या कालावधीमध्ये 1,51,251 सूर्यनमस्कार केले होते आणि तसाच हा उपक्रम यावर्षीही राबवण्यात आला असून सर्व कर्मचाऱ्यांनी मिळून 3, 16,671 सूर्यनमस्कार पूर्ण केले.
कंपनीच्या एकूण 230 कर्मचाऱ्यांचा आणि त्यात 30 महीला कर्मचाऱ्यांनाही सहभाग होता.. तसेच कंपनीच्या परिसरातील बहुतेक कंपन्यांमध्ये उल्हास जोशी सर यांच्या मार्गदर्शनातून योगाची जागृती करून त्यांनाही प्रोत्साहित केले आणि तेही या उपक्रमात सहभागी झाले आहेत.
ऑटर कंपनीचे मुख्य वित्तीय अधिकारी (CFO) गौरव जैन, प्लांट हेड गणेश मुळे व इतर कर्मचारी उपस्थित राहून योगदिनाची शोभा वाढविली, असे पुढील अनेक वर्षे नवनवीन प्रकल्प राबविण्यात येतील.














