न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- प्राधिकरणाने बांधलेल्या भाजी मंडईच्या लगत मोकळया जागेत कापड व बांबुच्या सहाय्याने आरोपींनी जागेत अतिक्रमण करून पाच ते सहा झोपड्या उभारल्या.
हा प्रकार (दि. २०) रोजी दुपारी ४.०० च्या सुमारास सेक्टर नं. ३९, स.नं. २१० मधिल जागेत फिर्यादीच्या निदर्शनास आला. याप्रकरणी विकास सत्यवान वाघमारे यांनी आरोपी अकुंश राजाराम चिंचोके, देविदास सखाराम चिंचोके, रामसिंग चिंचोडीया यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
वाकड पोलिसांनी ५९२/२०२३ भा.दं.वि. कलम ४४७, ३४ प्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.