न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- कंपनीने आरोपींना १,३९,३९,१६५ रुपयांचे कर्ज उपलब्ध करुन दिले गेले. तसेच कोरोना काळात पुन्हा रीझर्व बँकेने आदेशित केल्याप्रमाणे आरोपीला इसीएलजीएस नुसार पुन्हा २४,९०,००० रुपये अदा केले.
दरम्यान आरोपींनी कर्जाची परतफेड करण्याचे चुकविल्याने कंपनीच्या अपिलावरुन सरफेसी कायद्यान्वये जिल्हाधिकारी पुणे यांनी जा.क्र. सीक्यू / एस आर / २४०/२०२३ दि. १०/०२/२०२३ अन्वये जप्तीचे आदेश पारीत केले. त्या अनुषंगाने निवासी नायब तहिसलदार, मुळशी (पौड) यांनी कायदेशिर बाबीची पुर्तता करून (दि. २९/०३/२०२३) पंचासमक्ष पोलीस बंदोबस्तात गहाण असलेले चार फ्लॅट सीलबंद करुन कंपनीतर्फे फिर्यादीला ताबा दिला. मात्र यातील आरोपींनी सीलबंद केलेल्या फ्लॅटचे कुलूप तोडून आत गृहातीक्रमण केले आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. ०४/०६/२०२३ व त्यापुर्वी) वेळोवेळी फिर्यादीच्या राहत्या घरी कस्पटे वस्ती, वाकड याठिकाणी घडली. फिर्यादी संतोष कांतीलाल शिंदे यांनी आरोपी शेख चांदसाहब हुसेन, चांदसाहब शेख यांची दोन्ही मुले यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. वाकड पोलिसांनी आरोपींवर ५९१/२०२३ भा.दं.वि. कलम ४४७, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.