- अमित गोरखे यांची उद्यागमंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी….
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. 22 जून 2023) :- संभाजीनगर शाहूनगर परिसरात जी ब्लॉकमध्ये अनेक इमारतींना अनेक वर्षांपासून पूर्णत्वाचा दाखला देण्याचा विषय प्रलंबित आहे. त्यावर तोडगा काढण्याकरिता भाजपचे अमित गोरखे यांनी संभाजीनगर शाहूनगरमधील नागरिकांना समवेत घेऊन उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट ङेतली. त्यांना निवेदन दिले. यावेळी सोबत खासदार श्रीरंग बारणे उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, .औ.वि.म.च्या सुधारित विकास नियंत्रण नियमावली-2009 मधिल नियम क्र.30 (iv) नुसार इमारतीतील सज्जा यामधिल भिंत तोडून सज्जाचे क्षेत्र खोलीमधे समाविष्ट करण्याकरिता महामंडळ ठरविल त्या नुसार आधिमुल्य आकारुन परवानगी देण्याचे तरतूद आहे.
दि. 13/10/23 रोजी बैठक झाली. त्या ठरवानुसार इमारतीतील सज्जा प्रत्येक चौ.मी.साठी रहिवाशी वापरण्या करिता रहिवाशी दराने आकारुन त्याचे पत्रक निर्गमीत करण्यात आले आहे. याबाबत परिपत्रक क्र.B46900/2017 दिं.25/04/2017 ला विशेष नियोजन प्राधिकरण(SPA) यांना देण्यात आले आहे.
दिं.27/02/2017 संचालक मंडळाची बैठक झाली त्यात इमारतीचे नकाशे मंजुरी इमारत पूर्णत्व दाखल्याबाबतचे अधिकार विशेष नियोजन प्राधिकरण (SPA) यांना देण्यात आले. ऑनलाइन सिस्टीम बदला प्रमाणे सज्जा बंदिस्त करुन पूर्णत्वाचा दाखला मिळवण्यासाठी काही तांत्रिक अडचणी येत आहे.
सदर (SPA) पातळीवर ऑनलाइन प्रणालीमधे पूर्वी प्रमाणे बदल करण्यात यावे तसेच इमारतींना पूर्णत्वाचा दाखला मिळणे कमी विशेष बैठक घेउन आदेश काढावेत, असे निवेदनात अमित गोरखे यांनी म्हटले आहे.
यावेळी सोसायटीधारकांचे प्रतिनिधी संतोष खिरे, मारुती वावरे, सुनिल गडसिंगे, काशीराम सोनकनली, दीपक एकबोटे, धनजय खुडे उपस्थित होते.