- मृत नेपाळी व्यक्तीच्या मित्राला पोलिसांकडून अटक…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- अज्ञात कारणावरून डोक्याला मारहाण करुन गंभीर जखमी करीत एकाचा खुन करण्यात आला होता. प्रेमबहादुर करण थापा (वय ४० वर्षे रा. पाटीलनगर, बावधन) असे मयताचे नाव नाव होते. ही घटना (दि. १९ ते २१) ई स्क्वेअर बिल्डींग पाठीमागे असणा-या वॉल कंपाउंडलगत म्हसोबा मंदिराजवळ, रामनदी, बावधन येथे घडली होती.
याप्रकरणी मयताच्या फिर्यादी पत्नीने हिंजवडी पोलिस ठाण्यात ७४०/२०२३ भा. दं. वि. कलम ३०२ प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. दरम्यान हिंजवडी पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली आहे. अनिलकुमार राई असे आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत व त्याचा आणखी एक साथीदार हे मागील तीन-चार दिवसांपासून घटनास्थळाच्या आजुबाजुच्या परिसरात फिरत होते. घटनास्थळी असलेल्या म्हसोबा मंदीराजवळ झोपत होते. दरम्यान एकत्र भंगार गोळा करून ते विकुण त्यातुन मिळालेले पैसे हे मयत प्रेमबहादुर याने एकटयाने घेतल्याने त्यातील हिस्सा सदर आरोपीस देण्यास नकार दिल्याने त्याचा राग मनात धरून मयताच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केल्याचे आरोपीने कबुल केले आहे. तसेच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आणखीन दोन संशयीत साथीदार रंजन सुधीर विशु. रतनसिंग मनोहरसिंग चौहान यांनाही ताब्यात घेतले असून दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस उप निरीक्षक यशवंत साळुंके हे करित आहेत.