- भोसरी विधानसभा शिवसेना पदाधिकारी आढावा बैठक संपन्न…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २२ जून २०२३) :- लोकसभा निवडणुका समीप येवू लागल्याने शिवसेनेचा शिरूर लोकसभेत बैठकांचा जोर वाढू लागला आहे. भोसरी विधानसभा शिवसेनेच्या वतीने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी बूथ प्रमुख, शिवदूत, शाखा प्रमुख, विभागप्रमुख, पक्षाचे संघटन अशा अनेक विषयांवर आढळराव पाटील यांनी पदाधिकऱ्यांना मार्गदर्शन केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईमध्ये शिवसेनेचा ५७ वा वर्धापन दीन साजरा झाला आहे, त्यास शिवसैनकांचा अप्रतिम प्रतिसाद मिळाला आहे, विरोधकांच्या टीकेला नागरिकांच्या विकासातून उत्तर द्यायचे आहे, मुख्यमंत्र्यांचा पक्ष वाढीवर काम करण्याचा आदेश असल्याने आपण शिवसेना पक्ष संघटना वाढण्यावर जोमाने काम करावे, असेही आढळराव पाटील यांनी सांगितले.
मा. खासदार आढळराव पाटील यांच्या भोसरी येथील संपर्क कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपनेते मा. खासदार उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील, इरफान सय्यद कामगार नेते तथा शिवसेना उपनेते, जिल्हा प्रमुख भगवान पोखरकर, संभाजी शिरसाठ उपजिल्हा प्रमुख, भोसरी विधानसभा प्रमुख प्रा. दत्तात्रय भालेराव, उपशहर प्रमुख रामदास गाढवे बळीराम जाधव युवा उपजिल्हा प्रमुख अरुन जोखदंड ,मनिषताई परांडे महिला भोसरी विधानसभा प्रमुख, वाहतूक आघाडी प्रमुख मानसिंगराव जाधव प्रसिद्धी प्रमुख सुनील पवार युवा जिल्हा समन्व्यक सागर पचारणे युवा उपशहर प्रमुख दत्ता औरळे , समन्व्यक किशोर सवाई, युवा संघटक आशिष गौड, युवा समन्व्यक प्रदीप बालघरे .पराग जोशी भोसरी विधानसभा महिला समन्वयक गौरी शेलार,सोनाली बोरसे विभाग प्रमुख प्रसाद मा्यभट्ट अर्जुन बार्गजे, रुपीनगर शाखा प्रमुख राहुल पिंगळे आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.














