न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- व्हॉट्सअपवर वारंवार अश्लील मॅसेज व फोटो पाठवुन फिर्यादीचा वारंवार पाठलाग केला. भेटण्यासाठी बोलावुन फिर्यादीला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’, असे म्हणुन त्यांचा हात पकडला. फिर्यादीला जवळ ओढुन गिफ्ट व कॅटबरी देण्याचा प्रयत्न करीत त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल, अशी वर्तणुक करुन विनयभंग केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे.
ही घटना (दि. २३/०५/२०२३ पासुन दि.२२/०६/२०२३ पर्यंत) स्वाद हॉटेल समोरील रोडवर, जय गणेश साम्राज्य, भोसरी येथे घडली.
महिला फिर्यादीने आरोपी दिपक भरत हिरडे पाटील (वय ३० वर्षे, रा. शितोळेनगर, जुनी सांगवी) याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २६८/२०२३ भा.द.वि. कलम ३५४,३५४ (ड), ५०६, माहीती तंत्रज्ञान अधिनियम २०२०चे कलम ६७, ६७ (अ) नुसार आरोपीवर गुन्हा दाखल करीत त्याला अटक केली आहे.