- फळ विक्रेत्याकडे केली हप्त्याची मागणी…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- दुचाकीवर दुकानावर आलेल्या आरोपींनी कोयता दाखवून ” आम्ही कोयता गॅंगची माणसे आहोत; आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे, तुला येथे धंदा करावयाचा असेल तर, आम्हाला रोजचे २०० रुपये हप्ता दे, नाहीतर तुझे दुकान तोडुन टाकील ” अशी चौघांनी फिर्यादीला धमकी दिली.
हा प्रकार (दि. १९) रोजी ५.३० वाजेच्या सुमारास फळाच्या स्टॉलवर योगीराज चौक, देहुफाटा, आळंदी येथे घडला. फिर्यादी सोहम पदमाकर काळे (फळ व्यवसाय, रा. आंळदी) यांनी आरोपी शामा विटकर, ज्ञानेश्वर बडगे, राकेश काळे, अजय देवरस (रा.आळंदी) यांच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
दिघी पोलिसांनी २७८/२०२३ भादवि कलम ३८४, ३८५,३४ अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.