- मोशीच्या गोडाऊन चौकातील घटना; ड्रायव्हर अटकेत…
न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- वाहन भरधाव वेगाने, वाहतुकीच्या नियमांकडे दुलर्क्ष करुन हयगयीने, अविचाराने चालवुन फिर्यादीच्या दुचाकीला पाठीमागुन धडक दिली. फिर्यादी यांची पत्नी ही रोडवर पडल्याने कंटेनरचे पाठीमागील चाक तिच्या डोक्यावरुन गेले. गंभीर जखमी होवुन त्यांचा मृत्यु झाला.
अपघातामध्ये फिर्यादीच्या पाठीला, डाव्या पायास व डोक्यास जखम झाली असुन टु व्हीलर गाडीचे नुकसान झाले. आरोपी वाहनचालक फिर्यादीच्या ३२ वर्षीय पत्नीच्या मृत्यूस कारणीभुत झाला. हा अपघात मोहननगर कमानीसमोर, गोडाऊन चौकाकडे जाणाऱ्या रोडवर मोशी येथे घडला.
फिर्यादी सुभाष गुलाब पवार (वय ३५ वर्ष चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी आरोपी कंटेनर गाडीवरील चालक याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. एमआयडीसी भोसरी पोलिसांनी २६७/२०२३ भादवि कलम ३०४(अ), २७९, ३३७,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४.११९/१७७ प्रमाणे गुन्हा दाखल करीत आरोपीला अटक केली आहे.