न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- वर्क फॉर्म होमसाठी थोडी रक्कम भरून डेटा विकत घेण्यास सांगीतला. ऑनलाईन ऑर्डर पुर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल असे आमिष दाखवले. वारंवार डेटा विकत घेण्याचा बहाना करून फसवणुकीच्या इरादयाने पैसे देण्यास भाग पाडुन व विश्वास संपादन करुन Ozongfw या कंपनीने ॲमेझॉनची ऑर्डर्स देऊन फिर्यादीची एकुण ७,५०,७३६ रुपयांची आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. ९/०४/२०२३ ते दि. १४/०४/२०२३ रोजी पर्यत) स्वामी समर्थनगर सोसायटी, लिंकरोड, चिंचवड येथे घडली. महिला फिर्यादीने आरोपी मेरीकॉर व शगुन, मोबाईल नं. ९१५७४१८६३६३) आय. सी. आय. सी. आय बँक अकाउट नंबर ३३९७०५५००४००, ६४१४०५०५२८५६, ०५४४०५०१३३९, १२१७०५५००३३६ व येस बँक अकाउंट नंबर ०१२२६३३०००१९५९, ००५८६३३००००४१७०, ०४७४६३३००००१७१२ आणि आणि फोन पेनंबर ८९५८२०७३@ybl या नंबरधारक आरोपींच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
चिंचवड पोलिसांनी २७८/२०२३ भा.दं.वि. कलम ४०६,४१९, ४२०, • माहीती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (डी) अंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.