न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- स्पा सेंटरच्या नावाखाली दोन पिडीत महिलांना पैशांचे अमिष दाखवले. त्यांना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त करुन त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळालेल्या रकमेतून स्वतःची उपजिवीका भागविली.
पोलिसांच्या गुन्हे शाखा अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षास याबाबत माहिती मिळाली. त्यांनी (दि. २१) रोजी सायं ७.०० च्या सुमारास हिंजवडी-वाकड रोड येथे कारवाई करून एकाला ताब्यात घेतले.
त्याच्याकडून एकुण ८,०३० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. हिंजवडी पोलीस ठाण्यात राहुल नवनाथ कागणे याच्यावर ७४१/२०२३ भा.द.वि. कलम ३७० (३) सह अनैतिक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.