न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- GLOBAL CHAT PLATFORM SINGAPORE या कंपनीची एच.आर. मॅनेजर असल्याचा बनाव रचला. आरोपीने बनावट टेलिग्राम अकाउंटवरुन खोटी ओळख दर्शवुन, विश्वास संपादन करुन फिर्यादीची ६,६५,६५० रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणुक केली आहे.
ही घटना (दि. ९/०१/२०२३ ते दि. २४/०१/२०२३ दरम्यान) संत तुकारामनगर, पिंपरी येथे घडली. वसीम नुर मोहम्मद तांबोळी यांनी आरोपी व्हाटसअप मो.नं. अ९१९४१९३५८८५६ मोबाईल धारक अनोळखी महिला आरोपीच्या विरोधात फिर्याद दिली आहे.
पिंपरी पोलिसांनी ६५९/२०२३ भा.द.वि कलम ४२०, ४०६ माहिती तंत्रज्ञान कायदा कलम ६६ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.