न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २३ जून २०२३) :- सुदुंबरे येथील सिद्धांत अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये (पदविका) शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून विद्युत अभियांत्रिकी (Electrical Engineering) व एआयएमएल (artificial Intelligence Machine Learning) या दोन नवीन शाखांना अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, दिल्ली व इतर सर्व शासन मान्यता मिळाल्या असून नवीन इमर्जिंग मागणी असलेले अभ्यासक्रम शैक्षणिक वर्षापासून सुरू झाले आहेत.
आय टी क्षेत्रात एआयएमएल म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स ॲन्ड मशीन लर्निंग ही संगणक अभियांत्रिकीची नवीन उपशाखा आहे. औद्योगिक क्षेत्राची गरज ओळखून हे दोन्ही अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत, अशी हे माहिती प्राचार्य डॉ. लक्ष्मण कांबळे यांनी दिली.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या आधुनिक तंत्रज्ञान शाखेत प्रवेश घेता यावा आणि या आधुनिक क्षेत्रात सगळ्यांच्या खांद्याला खांदा लावून योगदान देता यावे ह्या हेतूने या नवीन शाखा सुरू करण्यात आल्या आहेत, अशी माहिती अभियांत्रिकी पदविका संयोजक प्रा. प्रविण फुटाणे यांनी दिली