न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. २८ जून २०२३) :- कुदळवाडी, चिखली येथील सामाजिक कार्यकर्ते उदयसिंह पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष पदी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी मुंबई येथील शिवनेरी सभागृहात झालेल्या बैठकीत नुकतीच नियुक्ती केली.
याप्रसंगी महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस संभाजीराजे दहातोंडे पाटील, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोष नानवटे, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्रीरंग बरगे उपस्थित होते.
उदयसिंह पाटील हे महापालिकेतील समाविष्ट झालेल्या गावांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी निर्माण केलेल्या पिंपरी चिंचवड मिळकतधारक संघटनेचे ते संस्थापक – अध्यक्ष असून यापूर्वी देखील युवक मराठा महासंघाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी प्रभावीरीत्या पार पाडलेली आहे. सद्यस्थितीला ते पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीचे प्रवक्ते म्हणून ही सक्रिय आहेत.












