न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- जुनी सांगवी पवार नगर येथील उत्कर्षा प्ले स्कूल अँड डे केअरमधील चिमुकल्यांचा विलोभनीय दिंडी सोहळा उत्साहात साजरा झाला.
मुख्याध्यापिका मनिषा पाटील यांनी श्री विठलाच्या प्रतिमेचे आणि पालखीचे पूजन केले. तसेच वारीचे महत्त्व त्यांनी मुलांना समजावले. पारंपरिक पोशाख परिधान करून विठ्ठल नामाचा गजर करीत चिमुकल्यांची पायी वारी काढण्यात आली.
वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. तसेच मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.















