न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- पायी जाताना अज्ञात रिक्षा चालकाने त्याची रिक्षा अविचाराने भरधाव वेगात चालवली. फिर्यादीच्या वडिलांना जोरात धडक दिली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यु झाला.
आरोपी रिक्षा चालक त्यांच्या मृत्यूस कारणीभुत झाला. अपघात ठिकाणी न थांबता पळून गेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. हा अपघात (दि. २५) रोजी रात्री ९.४५ च्या सुमारास दुर्गामाता मंदिराजवळ, औदुंबर चौक, साईनाथनगर, निगडी येथे घडला.
फिर्यादी नितीन बन्सी भुबाळ यांनी आरोपी अज्ञात रिक्षा चालकाच्या विरोधात फिर्याद दिली आहे. निगडी पोलिसांनी ३८५/२०२३ भा.द.वि.क. २७९,३३८,३०४(अ) व मोटार वाहन कायदा कलम १८४, ११९/ १७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
















