न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- आमदार श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच व वै ह भ प वामन महाराज यादव, कै नथु खंडु यादव, कै सुदाम नथु यादव, गुलाब नथु यादव सेवा संस्था आणि श्री पै महेशदादा लांडगे युवा मंच आणि स्वी. नगरसदस्य दिनेश यादव यांच्या वतीने आषाढी एकादशीनिमित्त कुदळवाडीतील श्री विठ्ठल मंदिरात जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते किसनराव लांडगे यांच्या हस्ते खिचडी व फराळ वाटप करण्यात आले.
यावेळी पदाधिकारी, सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला.














