न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ३० जून २०२३) :- यंदा थोड्या उशिराने दाखल झालेल्या मॉन्सूनने कसर भरुन काढण्यास सुरुवात केली आहे. आज शुक्रवारी जास्त उसंत न घेता दिवसभर संततधार सुरू आहे. पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ परिसरात पावसाच्या सततच्या माऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचले होते. तर काही ठिकाणी सोसायट्यांच्या बेसमेंटमध्ये देखील पाणी शिरले. तसेच शहरात काही ठिकाणी वृक्ष कोसळल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता. गुरुवारी सुरु झालेल्या पावसाच्या सरी थोड्या थोड्या अंतराने आज शुक्रवारपर्यंत बरसतच आहेत.
शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सोमवारी देखील सकाळपासूनच पिंपरी शहरासह उपनगरांमध्ये पावसाच्या सरींना सुरवात झाली. दिवसभर पावसाच्या हलक्या सरी पडत होत्या. शहरातील चिंचवड, मोशी, वालेकरवाडी, चिखली, भोसरी, रावेत, दापोडी, सांगवी याभागातही दिवसभर पाऊस होता.
आज झालेल्या पावसामुळे पिंपरी येथील नेहरूनगर, तुकाराम नगर तसेच उपनगरांमध्येही ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणीआज झालेल्या पावसामुळे पिंपरी येथील नेहरुनगर, तुकाराम नगर तसेच उपनगरांमध्येही ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले होते. रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात पाणी साचल्यामुळे वाहनचालकांना खड्डे चुकविताना कसरत करावी लागत होती. याशिवाय शहरातील सखल भागात पाणी साचल्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्यांचे स्वरुप आले होते. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता. दिवसभरात चांगला पाऊस झाल्याची नोंद शहर व उपनगरात झाली. परिसरात येत्या काही दिवसात मध्यम ते दमदार पाऊस होईन, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे.
















