न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०१ जुलै २०२३) :- हॉटेल कराचीचे शटर कशाच्यातरी साह्याने उचकटुन हॉटेलमध्ये आरोपींनी प्रवेश केला. रोख रक्कम व ३ मोबाईल फोन असा एकुण ६६०० रुपये किंमतीचा माल चोरी करून नेला आहे.
हा प्रकार (दि २९/०६/२०३) रोजी रात्री २२.३० ते दि ३०/०६/२०२३ रोजी पहाटे २.३० च्या दरम्यान हॉटेल कराची, अशोक थीएटर जवळ, एचडीएफसी बँकेशेजारी, पिंपरी येथे घडला.
फिर्यादी विशाल पेशुराम बक्तयारपुरी यांनी आरोपी दोन अनोळखी इसमांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. पिंपरी पोलिसांनी ६८४ /२०२३, भा.द.वि. कलमः ४५४, ४५७, ३८० प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे.
















