न्यूज पीसीएमसी नेटवर्क
पिंपरी (दि. ०२ जुलै २०२३) :- न्यु बालाजी ट्रेडर्स (होलसेल) किराणा दुकानाचे शटर अनोळखी तीन चोरट्यांनी लोखंडी गजाने उचकटुन आत प्रवेश केला. गल्यातील ड्रावरमध्ये ठेवलेले रोख १,५३,००० रुपये व कामगाराचा ओपो कंपनीचा मोबाईल फोन असा एकुण १,५५,००० रुपये किंमतीचा माल आरोपी घरफोडी करीत चोरी करुन दुचाकीवरून पळुन गेले आहेत, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ही घटना (दि. २) रोजी पहाटे ३.३० ते ४.०० च्या दरम्यान पी. के इंटरनॅशनल स्कुलसमोर, पिंपळे सौदागर येथे घडली. फिर्यादी अचलारामजी गोमारामजी चौधरी (वय ४२ वर्षे, धंदा- किराणा दुकाण, विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी आरोपी अज्ञात इसम याच्या विरोधात फिर्याद दिली आहे. सांगवी पोलिसांनी अज्ञात आरोपीच्या विरोधात ३१०/२०२३ भादवी कलम ४५७, ३८०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.















